डेल्टा प्लसचा कहर! रायगडमध्ये 2 रूग्णांचा मृत्यू

आता राज्यात डेल्टा प्लसच्या मृत्यूचा आकडा थेट 4 वर जाऊन पोहोचलाय.

Updated: Aug 13, 2021, 09:26 AM IST
डेल्टा प्लसचा कहर! रायगडमध्ये 2 रूग्णांचा मृत्यू title=

रायगड : राज्यात डेल्टा प्लसने कहरच केला आहे. डेल्टा प्लसच्या रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसतेय. त्यातच आता राज्यात मृत्यूचा आकडा थेट 4 वर जाऊन पोहोचलाय. रायगड जिल्ह्यात डेल्टा प्लसमुळे दोन जणांना मृत्यू झाला आहे. यामुळे आता राज्यात अजूनच चिंता वाढली आहे.

नुकतंच मुंबईत एका 60 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाल्याची माहिती होती. त्यातच आता रायगडमधील नागोठणे आणि उरणमध्ये 1-1 रूग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात डेल्टा प्लसमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 4 वर गेली आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.

मुंबईत बुधवारी एकाच दिवशी डेल्टा प्लस बाधित ७ रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आणखीन वाढली आहे. तर एका महिलेचा मृत्यू झाला असून या महिलेने करोनावरील लसचे दोन्ही डोस घेतले होते. 

अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, मुंबईत मृत्य़ू झालेल्या या महिलेला कोरडा खोकला तसंच अंगदुखीचा त्रास होत होता. शिवाय चवंही लागत नव्हती. त्यानंतर कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात महिलेवर उपचार सुरू होते. ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्यानंतर रेमडेसिवीर आणि स्टेरॉइड्स त्यांना देण्यात येत होतं. 

मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून डेल्टा प्लस विषाणूची लागण होऊन महिलेचा मृत्यू झाल्याचे जीनोम सीक्वेन्सिंगमध्ये स्पष्ट झालं आहे. डेल्टा प्लसचा हा राज्यातील दुसरा मृत्यू ठरला आहे. जूनमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये डेल्टा प्लसने महिलेचा मृत्यू झाला होता. 

राज्यात सध्या 65 डेल्टा प्लसचे रुग्ण होते. राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 20 नवे रुग्ण बुधवारी आढळले. त्यामुळे डेल्टा प्लस बाधित एकूण रुग्णांची संख्या 65 वर पोहचली. 

राज्यात डेल्टा प्लसचे आता एकूण 65 रुग्ण आहेत. बुधवारी एकाच दिवशी डेल्टा प्लसचे 20 नवे रुग्ण आढळले. नव्याने आढळलेल्या 20 रुग्णांपैकी मुंबईत ७, पुण्यात ३, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर इथे प्रत्येकी २, चंद्रपूर आणि अकोला इथे प्रत्येकी १ रुग्णांचा समावेश असल्याचं आरोग्य विभागाने सांगितलंय.