लातूर येथील अपघातात ५ जण जागीच ठार तर ६ जण गंभीर

 टेम्पो आणि अॅपे मॅजिकची समोरासमोर धडक होऊन ५ जण जागीच ठार झालेत तर ६ जणांची प्रकृती गंभीर आहे.  

Updated: May 6, 2019, 11:57 AM IST
लातूर येथील अपघातात ५ जण जागीच ठार तर ६ जण गंभीर title=

लातूर : शिरूर ताजबंद - मुखेड मार्गावर टेम्पो आणि अॅपे मॅजिकची समोरासमोर धडक होऊन ५ जण जागीच ठार झालेत तर ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एक वर्षाची प्राची अरविंद सोनकांबळे ही मॅजिकमधून फेकली गेल्याने सुदैवाने बचावली आहे. या घटनेनंतर अहमदपूर तालुक्यातील धामनगाववर शोककळा पसरली आहे. दरम्यान टेम्पोचा चालक हा फरार झाला आहे.

कडब्याने भरलेला भरधाव टेम्पो आणि एका लग्नाहून परतणाऱ्या अॅपे मॅजिकमध्ये हा भीषण अपघात झाला. अहमदपूर तालुक्यातील सोनकांबळे परिवार विळेगाव येथून लग्नसमारंभ आटोपून गावाकडे परतत असताना हा अपघात झाला. यात ५ जण जागीच ठार झाले आहेत. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जळकोट तालुक्यातील धामनगाव येथील हे सर्व मृत आहेत. लग्न समारंभ आटोपून सर्वजण गावाकडे जात होते. त्यावेळी रात्री नऊच्या सुमारास जांबकडून शिरुर ताजबंदकडे जाणाऱ्या टेम्पोची समोरासमोर धडक झाली. 

मृतांमध्ये ज्ञानोबा सोनकांबळे (४०), अरविंद सोनकांबळे (३०), पुष्पा सोनकांबळे (४५), कांताबाई सोनकांबळे (५५), छकुली सोनकांबळे (६) यांचा समावेश आहे. तर आरुशी सोनकांबळे, दिनेश सोनकांबळे, बळीराम सोनकांबळे, सुनीता सोनकांबळे, रितेश सोनकांबळे, प्राचीन सोनकांबळे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान टेम्पोचा चालक हा फरार झाला असून जळकोट पोलीस त्याचा शोध घेत आहेत.