ऐ 'दे दणादण', दोघांच्या प्रेमात तिसरा लुडबूडला आणि.. भररस्त्यात

ती म्हणाली, आता माझ्या आयुष्यात तो आलाय. मी त्याच्या प्रेमात पडलीय.

Updated: Apr 19, 2022, 09:58 AM IST
ऐ 'दे दणादण', दोघांच्या प्रेमात तिसरा लुडबूडला आणि.. भररस्त्यात title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या भानू कोरी या तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. पण, गेल्या काही दिवसांपासून ती त्याला टाळत होती. 

याच कारण त्यानं विचारलं असता तीन बेधडक उत्तर दिलं. ती म्हणाली आता माझ्या आयुष्यात शाकिब खान आलाय. मी त्याच्या प्रेमात पडलीय. आपल्या दोघांच्या प्रेमात हा तिसराच आलेला पाहून भानू कोरी संतापला. 

भानूने थेट शाकिबला फोन करून सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने भानूने त्याला नेताजी चौक परिसरात भेटायला बोलावलं. शाकिबला भेटायला जात असताना त्याने आपल्या सोबत मित्र सोनू सोनकर आणि मुकेश यादव यांना घेतलं.

मात्र, शाकिबला काहीतरी चुकीचं घडणार असल्याची कुणकुण लागली. त्यामुळे त्यानेही आपल्या सोबत इज्राइल, शहाबाज आणि सलमान या तीन मित्रांना आधीच तिथे बोलावून घेतलं होतं. 

शाकिब आणि भानू यांच्यात आधी बोलणं झालं. बोलता बोलता बाचाबाची झाली आणि त्याचं हाणामारीत रूपांतर झालं. दोघांचेही मित्र एकमेकांवर धावून गेले, भर रस्त्यात सुरु झाली फ्री स्टाईल मारामारी... 

ऐन वर्दळीच्या वेळी भररस्त्यात सुरू असलेली ही फ्रीस्टाईल हाणामारीची घटना मोबाईल कॅमेरातही चित्रित करण्यात आली. या हाणामारीत दोन्ही गटातले तरुण जखमी झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात परस्परविरोधी मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली.