राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी

Local body elections in  Maharashtra : राज्याच्या राजकारणात महत्वाची घडामोड घडण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीची ( Shiv Sena-NCP alliance) चर्चा सुरु झाली आहे. 

Updated: Apr 19, 2022, 11:02 AM IST
राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी title=

मुंबई : Local body elections in  Maharashtra : राज्याच्या राजकारणात महत्वाची घडामोड घडण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीची ( Shiv Sena-NCP alliance) चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे भाजप आणि मनसे युतीच्या (BJP-MNS alliance) चर्चा सुरु आहे. भाजपला साथ देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज संस्था आणि मनपा निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीची चर्चा सुरु आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची युतीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा सुरु आहेत. त्याला शह देण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

भाजप मनसे युती झाली तर त्यांना मुंबईसह ठाण्यात टक्कर देणे शिवसेनेला एकट्याला कठीण जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची साथ घेतली जाईल, असे संकेत मिळत आहेत. मुंबईत राष्ट्रवादीची ताकद फारशी नसली तरी ठाणे, पुणे, नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा शिवसेनेला फायदा होईल, असा अंदाज शिवसेना नेत्यांचा आहे.