जगावरील कोरोनाचे संकट दूर कर, उपमुख्यमंत्र्यांचं पांडुरंगाला साकडं

कार्तिकी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुंदर फुलांनी सजवले 

Updated: Nov 15, 2021, 07:40 AM IST
जगावरील कोरोनाचे संकट दूर कर, उपमुख्यमंत्र्यांचं पांडुरंगाला साकडं  title=

पंढरपूर : आज पहाटे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक केली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील टोणगे दाम्पत्याला मान मिळाला. श्री विठ्ठलाचे सावळे सुंदर रूप भाविक डोळ्यात साठवत आहेत.

कार्तिकी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुंदर फुलांनी सजवले आहे. आज कार्तिकी एकादशी सोहळा पंढरपुरात साजरा होत आहे. या निमित्ताने पुण्यातील भाविक राम जांभूळकर यांनी पाच टन फुलांनी मंदिर सजवले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर चौखांबि, सोळ खांबी, सभामंडप, संत नामदेव महाद्वार या ठिकाणी फुलांची सजावट तसेच तोरण बांधले आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील निळ गावच्या टोणगे दाम्पत्याला मिळाला आहे. कोंडीबा आणि पऱ्यागबाई टोणगे हे मागील 30 वर्षापासून पंढरीची वारी करत आहेत. शेतकरी दाम्पत्य असलेल्या या मानाच्या वारकऱ्यांनी, 'सगळ्या जगाचे कल्याण होऊ दे' हेच मागणे देवाकडे केले आहे.

अजित पवार यांनी सपत्नीक कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा केल्यानंतर संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाचे संकट कमी केल्याबद्दल विठ्ठलाचे आभार मानले. जगावरील कोरोनाचे संकट दूर करण्याचे विठ्ठलाला साकडे देखील घातले. जगात कोरोना तोंड वर काढतोय काळजी घ्या, असं सांगत अजित पवारांनी जनतेला कळकळीची विनंती देखील केली. 

शेतकरी, कष्टकरी जनतेला सुखात ठेव, सर्व जनता सुख समाधानाने राहू दे, असं देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी राहू दे.