Yavatmal News Today: यवतमाळ जिल्हा कारागृहाचे तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यावर 8 न्यायाधीन बंद्यांनी हल्ला चढवीत त्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसंच, त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तुरुंग कर्मचारी सूरज मसराम यांनी न्यायाधीन बंदी ओंकार कुंडले याला प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यापासून रोखल्याच्या रागातून त्याने मसराम यांची काठी हिसकावून त्यांना मारहाण सुरू केली. यावेळी तुरुंग अधिकारी धनाजी हुलगुंडे हे मध्ये आले असता ओंकारचे सहकारी असलेले अन्य सात कर्मचारी त्यांच्यावर धावून आले व त्यांनी हुलगुंडे यांच्यावर सामूहिक हल्ला चढवत मारहाण केली. कारागृहात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायाधीन बंदी कुंडले यांच्या अन्य साथीदारांनी दोन्ही शासकीय कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत हुलगुंडे यांच्या डाव्या हाताच्या बोटाला आणि उजव्या हाताच्या मनगटाला , छातीला, पाठीला मार बसला आहे. तर, सुरज मसराम यांना मानेला आणि दोन्ही हाताला दुखापत झालेली आहे. माराहणीच्या या घटनेनंतर ततुरुंग अधिकारी हुलगुंडे यांनी अवधुतवाडी पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी रितसर तक्रार दाखल केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्यूशनसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाठ्या-काठ्या, बेल्टसह तुंबळ हाणामारी करून एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना एन-१ मध्ये बुधवारी घडली आहे. महावितरण कार्यालयाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या ट्यूशनचे ४० ते ५० विद्यार्थी व अन्य टवाळखोरांमध्ये बुधवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडली. काही दिवसांपूर्वी याच विद्यार्थ्यांच्या भांडणातून थेट चाकू काढले गेले. मात्र, ट्यूशनच्या संचालकांकडूनकिंवा पोलिसांकडून याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. मात्र आता हा वाद पुन्हा उफाळला आहे.