शेतकरी विषबाधा प्रकरणी ८ कृषी केंद्रांवर गुन्हे दाखल

कीटकनाशक फवारताना २० शेतकऱ्यांचा बळी गेल्यावर सरकार खडबडून जागे झाले आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर चौफेर टीका होऊ लागल्यावर अनधिकृतपणे कीटकनाशकाची विक्री केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत ८ कृषी केंद्र चालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 9, 2017, 01:01 PM IST
शेतकरी विषबाधा प्रकरणी ८ कृषी केंद्रांवर गुन्हे दाखल title=

यवतमाळ : कीटकनाशक फवारताना २० शेतकऱ्यांचा बळी गेल्यावर सरकार खडबडून जागे झाले आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर चौफेर टीका होऊ लागल्यावर अनधिकृतपणे कीटकनाशकाची विक्री केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत ८ कृषी केंद्र चालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

गुन्हे नोंदवीण्यात आलेल्या एकूण ८ कृषी केंद्रांपैकी दोघांवर दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पहिल्यांदाच गुजरातच्या कीटकनाशक कंपनी विरुद्ध देखील गुन्हा दाखल झाला. मुकुटबन येथे गुजरातमधील यूपीएल कंपनीचे व्यवस्थापक आणि आनंद कृषी केंद्र चालक सुरेंद्र तातेड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. 
कीटकनाशक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे २० शेतकऱ्याचे हकनाक जीव गेले. साडेसातशेहून अधिक शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. कृषी केंद्रांमधून विनापरवानगी हे औषध विकले गेले. मात्र ही परवानगी देणारे आणि औषध विक्रीची तपासणी करण्याची जबाबदारी असलेल्या कृषी विभागाचे अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही.

दरम्यान, शेतातील पिकावर किटकनाशक फवारताना विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारने २ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्य बैठकीत हा निर्णय घेण्याता आला. शेतातील पिकावर फवारणी करताना या शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेतली नाही. त्यामुळे २० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर, तब्बल ५४६ शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

विदर्भात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या कपाशी आणि सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. सततच्या नापीकीला कंटाळलेला शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे कपाशीवरील किड आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी किटकनाशकांचा वापर फवारणी करताना करत आहे. दरम्यान, अशा वेळी योग्य ती काळजी न घेतल्याने शेतकऱ्यांना विषबाधा होत आहे.