'Dear Aaho...' नवऱ्याने छळलं तरी..., काळीज पिळवटून टाकणारं शेवटचं पत्र! डॉक्टर पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

छत्रपती संभाजी नगर शहरात एका 26 वर्षीय विवाहित डॉक्टर तरुणीने आपलं आयुष्य संपवलंय. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हा धक्कदायक निर्णय घेतला. पण जाण्यापूर्वी तिने 7 पानांची सुसाइड नोट लिहिलंय, जी वाचून डोळे पाणावतात. 

नेहा चौधरी | Updated: Aug 27, 2024, 10:52 AM IST
'Dear Aaho...' नवऱ्याने छळलं तरी..., काळीज पिळवटून टाकणारं शेवटचं पत्र! डॉक्टर पत्नीने उचललं टोकाचं पाऊल title=
Crime News doctor woman last letter husband harassment in Chhatrapati Sambhaji Nagar

छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आलीय. लग्नाच्या अवघ्या 4 महिन्यात  एका 26 वर्षीय विवाहित डॉक्टर तरुणीने आत्महत्या केला आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने टोकाच पाऊल उचलंय. प्रतीक्षा प्रीतम गवारे असं विवाहितेचं नाव असून लग्नांतर 4 महिन्यातील तिच्या मनातील खदखद शेवटच्या पत्रात लिहिलंय. हे पत्र वाचून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. संसार आणि नवऱ्याकडून प्रत्येक मुलीच्या काही कल्पना असतात. पण अनेक वेळात या स्वप्नांना तडा जातो. असंच काहीस प्रतीक्षासोबत घडलं. 

प्रतिक्षा पत्रात म्हणाली की..!

Dear Aaho..
खूप प्रेम केलं हो तुमच्यावर, जिवापाड प्रेम केलं. स्वतःला विसरुन गेले तुमच्यासाठी. माझ्यासारख्या हसत्या, खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करुन टाकलं तुम्ही. एका स्वावंलबी, Ambitious मुलीला Dependent बनवलं तुम्ही. खूप स्वप्नं घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी की हे मला खूप जीव लावतील. काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील. आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा हवा होता, त्यासाठीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती. तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं मी. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, आई वडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाइल बदल म्हणाले, बदलला. नंबर बदल म्हणून वाद घातले, त्यासाठीही तयार झाले. तरीही तुमचे डाऊट संपले नाहीत. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेत आलात. पण देवाशपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही.

सासू-सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलटसुलट बोलली नाही. त्यांनी पण मला जीव लावला. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते, असे म्हटले. मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं. तुमच्यावर मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला. तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं. पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाल आहे. पण तुम्ही एकटे आहात. सासू सासऱ्यांना नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका. आय लव्हू यू सो मच. बाय. यू आर अ फ्री बर्ड नाऊ.

तिने आपल्या वेदना या पत्रात कवितेतूनही मांडली आहे. 

माझ्या मनीचे दुःख सारे कधी तु जाणवलेच नाही
पावसात लपणारे अश्रू माझे तुला कधी दिसलेच नाही.

तुझ्याचसाठी हुरहुरणाऱ्या हृदयास तु पहिले नाही
तुझ्यासाठी झटणाऱ्या हातांना कधी चुंबले नाही
नशीब बांधले होते आपले, नाही त्यात षड्यंत्र काही

हा पण प्रेम होते आणि आहे (हे लिहून वाक्य खोडलं आहे)
दोष याला त्याला देण्यात कसला काही अर्थ नाही
मनीचे भाव मनाचे घाव याला काही महत्त्व नाही
तुझ्या नजरेत मी फक्त स्त्री आणखी काही नाही.

तुझ्याचपासून सुख माझे तुझ्याच‌साठी सर्व काही
मी स्वत:ला हरवून आले, याचे मला दुःख नाही
तू फक्त जपावे मला याहून जास्त अपेक्षा नाही
तुझ्यासाठी मी सगळं करेल यात काही शंका नाही

तुम्ही गोड आहात दिसायला, गोड राहा आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर तर मला एक टाइट हग करुनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा.

तुमचीच
प्रतीक्षा

दरम्यान लेकाच्या जाणाने कोलमडून पडलेल्या वडिलांनी सिडको पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी हुंडाबळी, पत्नीला त्रास देण्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर आरोपी प्रीतम शंकर गवारे फरार असून पोलीस शोध घेत आहेत.