अंबरनाथ : पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी निधी चौधरींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निधी चौधरींवर यांच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंबरनाथ शहरातील नगरपरिषदेच्या मालकीच्या असलेल्या चार इमारती विनापरवानगी तोडून त्याच्या डेब्रिजचाही अपहार केल्याचा आरोप चौधरी याच्यावर करण्यात आलाय.
याप्रकरणी माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले-पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर निधी चौधरी यांच्यासह तत्कालीन उपमुख्याधिकारी संग्राम नार्वेकर, तत्कालीन सहाय्यक नगररचनाकार कुमार धरणे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
चौधरी या सध्या पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.