नाशिक पालिकेत तुकाराम मुंढें विरोधात नगरसेवक आक्रमक

नाशिक महापालिकेच्या महासभेत सगळ्याच नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोप करत आक्रमक पावित्रा घेतला.

Updated: Sep 19, 2018, 07:07 PM IST
नाशिक पालिकेत तुकाराम मुंढें विरोधात नगरसेवक आक्रमक title=

नाशिक : आज पुन्हा एकदा नाशिक महापालिकेच्या महासभेत सगळ्याच नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोप करत आक्रमक पावित्रा घेतलाय. शहरात कुठलंही काम होत नाही, त्यामुळे प्रभागात फिरकणं कठीण जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. नगरसेवक निधी मिळत नसल्याने नगरसेवकांचा पालिका प्रशासनावर रोष आहे.  

सद्सद्विवेक बुद्धी वापरून कामे करावी, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली होती.त्यावर आयुक्त मुंढे यांनी सद्सद्विवेक बुद्धी वापरूनच कामे केली आहे, असे सांगताच सभागृहात सदस्यांनी गोंधळ केला. आयुक्त मुंढे यांनी खुलासा करताच सदस्य आक्रमक झाले.

उत्तरे द्या भाषण नको, हुकुमशाही नको असं म्हणत नगरसेवकांना गोंधळ घातला. मला टार्गेट करून नाशिकचा विकास होणार नाही, सर्वंकष विचार करा आणि माझी चूक असेल तर दाखवून द्या असं मुंडे म्हणाले.