अहमदनगर : महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष श्रीगोंदाचे माजी आमदार शिवाजीराव तथा बापू नागवडे यांचे आज सायंकाळी 5.30 वाजता मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८५ होते.
बापू नागवडे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान म्हणून त्यांनी आपली ओळख शेवटपर्यंत कायम ठेवली. जिल्ह्यात ते 'बापू' या नावाने ते परिचित होते. १९७८ आणि १९९५ असे दोनवेळा त्यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधीत्व केले.
श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याची उभारणी त्यांच्याच पुढाकारातून झाली. तालुक्यात शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी गावागावात शिक्षणाचे जाळे उभे केले आहे. त्यांचे पुत्र राजेंद्र नागवडे हे सध्या श्रीगोंदा कारखाण्याचे अध्यक्ष आहेत तर स्नुषा अनुराधा नागवडे या जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत.