राज्यात दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येनं किमान दिलासा

जाणून घ्या राज्यातील दिवसभरातील कोरोनाची आकडेवारी 

Updated: Oct 4, 2020, 10:21 PM IST
राज्यात दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येनं किमान दिलासा  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : देशभरात मोठ्या वेगानं पसरणाऱ्या coronavirus कोरोना व्हायरस कोविड 19 या विषाणूचा संसर्ग महाराष्ट्रातही चिंतेचा विषय ठरु लागला आहे.  देशाप्रमाणंच राज्यातही दर दिवशी कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या फरकानं भर पडत आहे. रविवारी दिवसभरात राज्यात १३,७०२ नवे कोरोनाबाधित आढळले. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे यासंदर्भातील माहिती देण्यात आली. 

रविवारी कोरोनामुळं दगावणाऱ्यांची संख्या ३२६ इतकी होती. तर, या दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा १५,०४८ इतका होता. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा इतका मोठा आकडा ही नक्कीच दिलासादायक बाब आहे असं म्हणायला हरकत नाही.  

दरम्यान, राज्यातील नव्या रुग्णांचा आकडा पाहता एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४,४३,४०९ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये ३८,०८४ मृत्यू आहेत. तर, ११,४९,६०३ रुग्णांना कोरोनावरील उपचारांनंतर रुग्णालयांतून रजा देण्यात आली आहे. 

 

मागील २४ तासांमध्ये देशात कोरोना रुग्णांनी ७५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. परिणामी देशात कोरोना रुग्णांची संख्या ६५ लाखांवर पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागच्या २४ तासांत ९४० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळं कोरोना मृतांची संख्या १ लाख १ हजार ७८२वर पोहोचली आहे. सध्या देशात करोनाबाधितांची एकूण संख्या ६५ लाख ४९ हजार ३७४ इतकी आहे.