'...तर पतंजलीवर गुन्हा दाखल करणार', गृहमंत्र्यांचा इशारा

कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करत पतंजलीने बाजारात कोरोनिल हे आयुर्वेदिक औषध लॉन्च केलं. 

Updated: Jun 25, 2020, 09:49 PM IST
'...तर पतंजलीवर गुन्हा दाखल करणार', गृहमंत्र्यांचा इशारा title=

मुंबई : कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करत पतंजलीने बाजारात कोरोनिल हे आयुर्वेदिक औषध लॉन्च केलं. या औषधाला महाराष्ट्रात बंदी घालत असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. यानंतर आता अनिल देशमुख यांनी पतंजलीला इशारा दिला आहे. कोरोनिल औषधाला आयुष मंत्रालय आणि आयसीएमआरने परवानगी दिली नसतानाही राज्यात दिशाभूल करणारी जाहिरात करण्यात आली तर पतंजलीवर नियमानुसार गुन्हा दाखल केला जाईल, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. 

कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायलबाबत कोणताही पुरावा नाही. जयपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या औषधाचं क्लिनिकल ट्रायल करण्यात आले होते की नाही, याचा शोध घेईल. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनिलची विक्री होणार नाही, असं अनिल देशमुख म्हणाले होते. 

दुसरीकडे आयुष मंत्रालयानेही पतंजलीला दणका दिला आहे. आयुष मंत्रालयाकडूनही या औषधाची चौकशी करण्यात येणार आहे. कुणी कोरोनाच्या नावावर औषध बनवून त्याचा प्रचार आणि प्रसार करु शकत नाही, असे निर्देश  केंद्र सरकारने दिले आहेत.