सरकारी कर्मचाऱ्यांना फटका, मार्चच्या उर्वरित वेतनाला एवढा उशीर होणार

कोरोनाच्या संकटामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने धक्का दिला आहे.

Updated: Apr 22, 2020, 11:08 PM IST
सरकारी कर्मचाऱ्यांना फटका, मार्चच्या उर्वरित वेतनाला एवढा उशीर होणार title=

मुंबई : कोरोनाच्या संकटामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने धक्का दिला आहे. मार्च महिन्यातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या पगारासाठी सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना गणेशोत्सवापर्यंत वाट बघावी लागणार आहे. एप्रिल महिन्यात मात्र कर्मचाऱ्यांना संपूर्ण पगार मिळणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यातील वेतन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २ टप्प्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर मार्च महिन्याच्या पगाराची पहिल्या टप्प्यातील रक्कम कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मिळाली. पण दुसऱ्या टप्प्यातील रक्कम अजूनही मिळालेली नाही. आता ही रक्कम गणेशोत्सवात देण्याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येतील, असं सरकारी प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आलं आहे.

राज्य सरकारच्या अ, ब आणि क श्रेणीतील पगार दोन टप्प्यात होणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. यानंतर मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्याचं वेतन मिळालं होतं.