मुंबई: देशातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र ठरत असलेल्या महाराष्ट्रात बुधवारी ४३१ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता महाराष्ट्रातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ५६४९ इतका झाला आहे. आतापर्यंत राज्यातील ७८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, हीच राज्याच्यादृष्टीने एकमेव दिलासादायक गोष्ट आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे २६९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या संकटकाळात राजकारण करू नका, गडकरींचा महाराष्ट्रातील नेत्यांना सल्ला
राज्यात आज नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील १५४ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये धारावीतील ९ जणांचा समावेश आहे. त्यामुळे धारावीतील एकूण रुग्णसंख्या १८९ वर पोहोचली असून आतापर्यंतो कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या १८ जणांपैकी १० जण हे मुंबईतील आहेत. तर उर्वरित मृतांमध्ये पुणे येथे २, औरंगाबाद येथे २ तर कल्याण-डोंबिवली येथील १, सोलापूर मनपा येथील १, जळगाव येथे १ आणि मालेगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
....तर एप्रिलच्या अखेरपर्यंत लाखभर लोकांना कोरोना झाला असता
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ९० हजार २२३ नमुन्यांपैकी ८३ हजार ९७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनासाठी निगेटिव्ह आले आहेत. तर ५ हजार ६४९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९ हजार ७२ लोक होम क्वारंटाइन तर ८ हजार ५१ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.