कौतुकास्पद : कोरोना रुग्णांसाठी खासगी डॉक्टरांचा 'अकलूज पॅटर्न'

सध्या येथे १०० बेड असून जनरल, आयसीयू, सारी असे विविध विभाग आहेत.

Updated: Aug 16, 2020, 10:50 AM IST
कौतुकास्पद : कोरोना रुग्णांसाठी खासगी डॉक्टरांचा 'अकलूज पॅटर्न'  title=

सचिन कसबे, झी मीडिया, सोलापूर : कोरोना रुग्णांची खासगी रुग्णालय आणि डॉक्टरांकडून लूट होत असल्याच्या बातम्या आपल्या निदर्शनास येत असतात. पण या डॉक्टरांनी आदर्श ठेवावा असा अकलूज पॅटर्न समोर आलाय. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये एक चांगला पॅटर्न अस्तित्वात आणलाय. अकलूजमधील खाजगी डॉक्टरांनी एकत्र येऊन १०० बेडचे कोविड रुग्णाच्या उपचारासाठी स्वतंत्र हॉस्पिटल तयार केले आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी या कोविड रुग्णाचे उद्घाटन केलंय. 

राज्यातील अनेक भागात कोविड रुग्णाची संख्या वाढत आहे. कोविड केयर सेंटर मध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार होत आहेत. पण व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांना खाजगी हॉस्पिटल शिवाय पर्याय नाही. खाजगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णाच्या उपचारासाठी सुविधा केली तर इतर आजाराच्या रूग्णा मध्ये भीती असते.

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्वतंत्र  कोविड हॉस्पिटल करता येईल अशी कल्पना सुचवल्यानंतर अकलूज मधील आयएमएचे अध्यक्ष डॉ. नितिन एकतपुरे आणि इतर डॉक्टर यांनी अशा स्वतंत्र कोविड १९ हॉस्पिटल साठी योगदान दिले. 

सध्या येथे १०० बेड असून जनरल, आयसीयू, सारी असे विविध विभाग आहेत. दररोज १५ डॉक्टराचे पथक येथील रुग्णाना बरे करण्यासाठी काम करेल. दररोज डॉक्टराचे पथक बदलले जाईल. 

राज्यातील हा पहिलाच प्रयोग असावा. त्यामुळे अकलूजच्या कोविड हाॅस्पिटल ला अधिक उपकरणे आणि सुविधा लागल्या तर शासन मदत करेल असा विश्वास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला.  यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,आमदार  राम सातपुते, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, धैर्यशील मोहिते पाटील, डॉ. एम. के. इनामदार आणि आय एम ए चे सर्व सदस्य उपस्थित होते.