राज्यात कोरोनाचा कहर; मुंबईत 11 हजार 163 नव्या रूग्णांची नोंद

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ   

Updated: Apr 4, 2021, 09:10 PM IST
राज्यात कोरोनाचा कहर; मुंबईत 11 हजार 163 नव्या रूग्णांची नोंद title=

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू केले आहेत. कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. राज्यात आज 57 हजार 74 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे निर्बंधांचा पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. 

 कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज सर्वाधिक 1 हजार 693 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. उपचार घेत असलेले रुग्ण 10 हजार 308 आहेत. गेल्या 24 तासात 3 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आज कोरोना रूग्णांची  संख्या 11 हजार 163 नोंद करण्यात आली आहे. 

जालना जिल्ह्यात २४ तासात कोरोनाचे ५६७ नवे रुग्ण सापडले आहे. गेल्या २४ तासात ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या २८ हजार ४९९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ५२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात आज 1 हजार 179 कोरोना बाधित रुग्ण आढळले.  जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 93 हजार 600 वरपोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 8 हजार 339 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे.  जिल्हात आज 14 कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

अकोल्यात २४ तासात कोरोनाचे नवीन २६६ रुग्ण, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूरमध्ये गेल्या 24 तासात 2 हजार 560 नमुने तपासणीतून 364 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.