मुंबई-पुण्यातली दुकानं उघडायला या अटींसह परवानगी

लॉकडाऊनमध्ये दुकानं उघडण्याला राज्य सरकारने अटींसह परवानगी दिली आहे. 

Updated: May 3, 2020, 06:20 PM IST
मुंबई-पुण्यातली दुकानं उघडायला या अटींसह परवानगी title=

मुंबई : लॉकडाऊनमध्ये रेड झोनमधली दुकानं उघडण्याला राज्य सरकारने अटींसह परवानगी दिली आहे. रेड झोन असलेल्या मुंबई प्रदेश आणि पुणे प्रदेशातली दुकानंही व्यापाऱ्यांना सशर्त उघडता येणार आहेत. फक्त कंटेनमेंट झोनमधली दुकानं उघडता येणार नाहीत. उद्या म्हणजेच ४ मेपासून हे नियम लागू होणार आहेत.

काय आहेत नियम?

स्टॅन्ड अलोन दुकानांना म्हणजेच मॉल आणि प्लाझा वगळता सिंगल शॉप दुकानांना परवानगी

- जीवनावश्यक नसलेली एका लेनमधली ५ दुकानं उघडली जाऊ शकतात. जीवनावश्यक वस्तूंसाठी दुकानांच्या संख्येचे निर्बंध नाहीत.

- सर्व दुकानांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं बंधनकारक

- दारूची दुकानं उघडायला परवानगी, पण हॉटेल आणि मॉलमध्ये दारूविक्रीला परवानगी नाही

- सलूनची दुकानं उघडायला परवानगी नाही

- दुकानं उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ  स्थानिक यंत्रणा ठरवणार.

महाराष्ट्रामध्ये सध्या १४ रेड झोन, १६ ऑरेंज झोन आणि ६ ग्रीन झोन आहेत. 

रेड झोन

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगर 

ऑरेंज झोन

रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड, वर्धा 

ग्रीन झोन

उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा 

ही दुकानं उघडण्याला परवानगी