विदर्भाला कोरोनाचा विळखा : नागपुरात कारवाई, वर्ध्यात महाविद्यालये बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus,) वाढत असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भात (Vidarbha) कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होताना दिसत आहे.  

Updated: Feb 16, 2021, 11:08 AM IST
विदर्भाला कोरोनाचा विळखा : नागपुरात कारवाई, वर्ध्यात महाविद्यालये बंद  title=

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus,) वाढत असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भात (Vidarbha) कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होताना दिसत आहे. काल नागपुरात (Nagpur) 498 कोरोनाबाधित वाढलेत. शहरात तीन आणि ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. महत्वाचं म्हणजे काल 2 हजार सहाशे 35 चाचण्या झाल्या होत्या. यामध्ये 498 पॉझिटीव्ह आले असून त्याचे प्रमाण 18 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या दहा दिवसांपासून नागपुरात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला असून त्यामुळे प्रशासनाच्याही चिंता वाढल्या आहेत. दरम्यान कोरोनाच्या नियमांचं अजून पालन होत नसल्याचं चित्र शहरात अनेक ठिकाणी दिसून  येत आहे. पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. (Corona in Vidarbha: Municipal action in Nagpur, colleges closed in Wardha)

अकोला जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये बंद

नागपुरात कोरोनाचा प्रादुरर्भाव एकीकडे वाढत असताना त्याबाबतच्या नियमांचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने  कारवाई अजून तीव्र केली आहे. निर्धारित संख्येपेक्षा अधिक व-हाडी आढळून आल्याने  काल महापालिकेनं विवाह सोहळा असलेल्या परिवारासह मंगल कार्यालयालाही दंड ठोठावला आहे. 

नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने नरेंद्रनगर येथील तुकाराम सभागृहात झालेल्या लग्न समारंभात निर्धारित संख्येपेक्षा जास्त संख्या लोक असल्याने दहा हजार  रुपयांचा दंड वसूल केला धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकानं ही कारवाई केलीय.  तुकाराम सभागृहाचे संचालक व ज्यांच्याकडचे लग्न समारंभ होते त्यांच्याकडून प्रत्येकी 5 हजार रुपये दंड वसूल केला आहे.
 
तर वर्धा जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये राहणार बंद आहेत. वर्ध्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी तसा आदेश जारी केला आहे. वर्धा जिल्ह्याची कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता महाविद्यालये बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व कृषक आणि महाविद्यालये राहणार बंद आहेत.28 फेब्रुवारीनंतर कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय महाविद्यालयाबाबत घेण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.