मयुर निकम, बुलडाणा : एकाच दिवशी कोरोनाचे तब्बल 199 रुग्ण आढळल्याने बुलडाण्यात चिंता वाढल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 199 कोरोनाचे रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली. प्रशासनाने याबाबत गंभीरता घेऊन तात्काळ संचार बंदीचे आदेश लागू केले आहेत.
या संदर्भात जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी हे आदेश काढले असून जिल्ह्यात आता एकप्रकारे लॉकडाऊनसदृश परिस्थिती निर्माण होणार आहे. आदेश निघाल्या निघाल्या तात्काळ पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.
कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. काही शहरात ही वाढ गंभीर होत चालली आहे. त्यामुळे पुन्हा कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या शहरांव्यतिरिक्त ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढल्या आहेत. विदर्भ, औरंगाबाद अलर्टवर आहेत. परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. गरज पडल्यास कारवाईचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी काय दिलेत आदेश पाहा