कोरोना संकट । राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार

कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. 

Updated: Sep 25, 2020, 10:05 PM IST
कोरोना संकट । राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार   title=
संग्रहित छाया

मुंबई : कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. तर अनेक गोष्टी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विरोधकांकडून सातत्याने मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे यावरील बंदी उठविण्याची मागणी केली आहे. मात्र, सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केल्याने राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार आहेत.

राज्य सरकार निर्णय घेईपर्यंत राज्यातील मंदिर आणि इतर धार्मिक स्थळे बंदच राहणार आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशातल्या काही राज्यांत धार्मिक स्थळे खुली असली तरी महाराष्ट्रात ती बंदच राहणार आहेत. या निर्णयामुळे कोरोनाच्या काळात विरोधकांची मागणी फेटाळण्यात गेली आहे.

राज्यात २,७२,७७५ रुग्णांवर उपचार 

दरम्यान, महाराष्ट्र राज्यात आज कोरोनाचे १७,७९४ रुग्ण वाढले आहेत. तर गेल्या २४ तासात १९,५९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १३,००,७५७ वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत ९,९२,८०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजूनही राज्यात २,७२,७७५ रुग्ण उपचार घेत आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही नियंत्रणात आलेली नाही. राज्यात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ७६.३३ % टक्के इतका झाला आहे. तर मृत्यूदर २.६७ टक्के इतका आहे. सध्या राज्यात १९,२९,५७२ जण होम क्वारंटाईन असून ३२,७४७ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.