vegetable price : पेट्रोल आणि डिझेलचे (petrol diesel rate) दर वाढले आहेतच. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये डिझेलनेही प्रति लिटर शंभरी गाठली आहे. आता अशात भाज्याही (vegetya) महाग झाल्या आहेत. कांदे, बटाटे, टोमॅटो या रोज लागणाऱ्या भाज्या तर महाग झाल्या आहेतच. शिवाय इतर भाज्याही महाग झाल्या आहेत. त्यामुळे आता खायचं काय? हा प्रश्न सामान्य माणसापुढे आवासून उभा राहिला आहे. (coriander and all vegetable vegetables rates hike)
कोथिंबिरीचा (Coriander price) दर गगनाला भिडला असून कोथिंबीर जुडी थेट 200 रुपयांना विकली जात आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी भाजीपाला दर मात्र चढेच आहेत. अशातच सर्वच भाज्यांत ( vegetables rates hike) वापरल्या जाणाऱ्या कोथिंबीर जुडीने उच्चांक गाठला आहे.
आवक कमी झाल्याने नाशिकमध्ये सध्या कोथिंबिरीला (Coriander price) चांगला भाव मिळत आहे. जवळपास 160 रुपये जुडी एवढा भाव व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याला मिळत असून बाजारात 200 रुपयांनी कोथिंबीर जुडीची विक्री होत आहे.
पावसामुळे भाजीपाल्याची अवस्था खराब झाली असून अद्यापही शेतमालाची आवक (agricultural produce) देखील बाधित आहे. नियमित होत असेल्या आवकेच्या तुलनेत अवघी 50 ते 60 टक्के आवक सध्या सुरू असल्याने भाजीपाल्याचे दर (Vegetable rates) कडाडलेलेच आहेत. पालेभाज्या तर मिळेनाशा झाल्या आहेत. ज्या थोड्याफार पालेभाज्या उपलब्ध होत आहेत. त्यांचे दरही जास्त असल्याचे चित्र आहे.
कोणत्याही भाजीचे दर 20 किंवा 30 रुपये पावशेरपासून सुरु होऊन 120 ते 160 रुपये किलोपर्यंत जात आहेत. दरम्यान बाजारात भेंडी, शिमला, गिलके, दोडके, बटाटे, वांगी अशा नेहमीच्या भाज्या आवाक्याबाहेर दिसत असल्याने मुलांच्या डब्यात काय द्यायचे असा प्रश्न गृहिणींना सतावत आहे.
वाचा : देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील 'या' भागात, जाणून घ्या दर
असे आहेत नाशिकमधील भाज्यांचे दर
अद्रक 80 रुपये किलो
लवंगी मिरची 100 किलो
शेवगा 70 रुपये किलो
ढेमस् 60 रुपये किलो
काकडी 550 रुपये कॅरेट
टोमॅटो 1100 रुपये कॅरेट
कोबी 200 रुपये कॅरेट
कोथिंबीर 200 रुपये जुडी
कारले 50 रुपये किलो
भोपळा 300 रुपये कॅरेट
फ्लॉवर 150 रुपये कॅरेट