भाजप सरकारविरोधात काँग्रेस काढणार आक्रोश मेळावा

राज्य सरकारने शेतकर्यासाठी केलेली कर्जमाफी फसवी आहे. सरकारने बौद्धिक दिवाळखोरी दाखवून शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय

Updated: Oct 28, 2017, 09:29 PM IST
भाजप सरकारविरोधात काँग्रेस काढणार आक्रोश मेळावा title=

नाशिक : राज्य सरकारने शेतकर्यासाठी केलेली कर्जमाफी फसवी आहे. सरकारने बौद्धिक दिवाळखोरी दाखवून शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजप शिवसेना सरकारने प्रगत महाराष्ट्राला अधोगतीकडे नेलंय. सरकारने वाघाचे दात काढून टाकल्याची टीका विखे पाटील यांनी शिवसेनेवर केली. सर्व आघाड्यावर अपयशी ठरलेल्या राज्यसरकार विरोधात राज्यभर आक्रोश मेळावा काढणार असून ३१ ऑक्टोबरला अहमदनगर जिल्ह्यापासून सुरवात करण्याची घोषणा त्यांनी केली.

कर्जमाफीचे नियोजन चुकल्याने सरकार आता बँकावर खापर फोडताय. मात्र आधारकार्डच्या मुद्यावरून केंद्र सरकारने राज्य सरकारला चपराक दिल्याची टीका विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.