'शपथविधीसाठी सदरे शिवायला टाकलेत' मुख्यमंत्रीपदासाठी नाना पटोले इच्छुक

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये अनेक घडामोडींना वेग आला आहे. अशातच जागावाटप सुरु असतानाच नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातला वाद चव्हाट्यावर आलाय. 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 19, 2024, 10:10 PM IST
'शपथविधीसाठी सदरे शिवायला टाकलेत' मुख्यमंत्रीपदासाठी नाना पटोले इच्छुक title=

Nana Patole : राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होताच राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावर अनेक बैठका देखील होत आहेत. अशातच झी 24 तासने आयोजित केलेल्या जाहीरसभा कार्यक्रमासाठी विदर्भाचे नेते नाना पटोले यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 

महाराष्ट्राला वाचवणं हा आमचा धर्म

ज्या प्रकारे गेल्या अडीच वर्षाव सरकारने महाराष्ट्र विकण्याचं काम केलं. महाराष्ट्र द्रोही सरकार शिवद्रोही सरकार आहे. लहान मुलीवर अत्याचार, महिला सुरक्षित नाहीत, शेतकरी सुरक्षित नाही, बेरोजगारांचा महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या या सरकारच्या विरोधात आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय. महाराष्ट्र वाचवणं हा आमचा धर्म आहे. हिच भूमिका घेऊन आम्ही महाराष्ट्रा समोर जाणार आहोत. 

'शपथविधीसाठी सदरे शिवायला टाकलेत' 

नाना पटोले यांना आवरण्यसाठी खूप वेळ लागतो? म्हणून नाना पटोले यांनी कपडे शिवायला दिले आहेत का? असा प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, नाही, कपडे शिवायला दिलेच नाही. एका जणाने नाना पटोले ऐवढे पांढरी शुभ्र कपडे त्यांचं राहणीमान ऐवढे पैसे कुठून आणतात अशी टीका केली होती. कुठलाही कपडा घातला तर तो माझ्यावर चांगला दिसतो. आता लांबून बघणाऱ्या लोकांना तो महागडा वाटतो. त्यामध्ये माझा काय द्वेष आहे. देवाने मला ते गॉड गिफ्ट दिलं आहे.  

संजय राऊत सकाळचा भोंगा

जागावाटपाबाबत 10 ते 12 बैठका झाल्या आहेत. जागावाटप हे मिरीटनुसार होणार. जस जयंत पाटील हे राष्ट्रवादीकडून आहेत. त्यांचे नेते शरद पवार आहेत. ते सर्व माहिती त्यांना देतात. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे आहेत. ते त्यांच्या पक्षाचे निर्णय घेत असतात. तसेच आमच्या पक्षाचे हायकमांड हे दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे आम्हाला सर्व माहिती त्यांना द्यावी लागते. काल झालेल्या बैठकीनंतर देखील मी सांगितलं की जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली. जे काही राहिलं आहे ते आम्ही हायकमांडला सांगितले आहे. हायकमांड जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य राहिलं. 

मात्र, सकाळी साडे नऊ वाजता जे काही होतं. ते तुम्ही दिवसभर टीव्हीवर चालवता. महाविकास आघाडीमध्ये आता सुद्धा तणाव नाही. पण महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव सुरु आहे. महायुतीचे लोक हे दाखवत नाहीत. 

संजय राऊत यांच्यातला वाद चव्हाट्यावर

महाविकास आघाडीचं विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप खेळीमेळीच्या वातावरणात सुरु असतानाच नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातला वाद चव्हाट्यावर आलाय. या वादामुळं महाविकास आघाडीची पहिली यादी लांबणीवर पडलीय. मविआच्या 260 जागांवर एकमत झाल्याचं सांगण्यात येत होतं. पण तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि नाना पटोलेंमध्ये वाद निर्माण झालाय. या वादात मध्यस्थीसाठी रमेश चैन्नीथला यांना मातोश्री गाठावी लागली. त्यांनी वादावर न बोलता उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची माहिती देऊन काढता पाय घेतला.

...तर पक्षात पाडापाडी होण्याची शक्यता 

काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जागावाटपातील वाद तोपर्यंतच मर्यादित राहिला तर ठिक..... निवडणुकीत हा वाद राहिल्यास काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पाडापाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.