चंद्रपूर : जिल्हा सध्या हवामान, राजकीय आणि समाजमन अशा तिन्ही स्तरांवर तापलाय. राजुरा येथील आदिवासी विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणात जिल्ह्यात आंदोलने झाल्यानंतर चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांनी केलेल्या विधानानंतर अडचणीत आले. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.
पीडित आदिवासी पालक पैशांच्या मोहापायी तक्रार करत असल्याचं खळबळजनक विधान धोटेंनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर धोटेंवर चौफेर टीका झाली. महिला आयोगानेही त्यांना जाब विचारला. धोटेंच्या या विधानामुळे जिल्ह्यात पक्ष चांगलाच अडचणीत आला. त्यामुळे अखेर धोटे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याककडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. हा राजीनामा अशोक चव्हाण यांनी तो स्विकारला.