पंतप्रधान मोदी शिर्डीत खोटे बोललेत - काँग्रेस

'पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत खोटे बोललेत'

Updated: Oct 19, 2018, 09:57 PM IST
पंतप्रधान मोदी शिर्डीत खोटे बोललेत - काँग्रेस title=

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 10 घरांच्या चाव्या देण्यांचा शिर्डी येथील कार्यक्रम म्हणजे आवळा देवून भोपळा काढण्याचा प्रकार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी केली. साईबाबांच्या दर्शनासाठी येऊन पंतप्रधान घरकुल योजनेबाबत खोटे बोलल्याचेही चव्हाण म्हणालेत. मोदींनी दिशाभूल करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केल्याचा दावा यावेळी चव्हाण यांनी केला.

यूपीएच्या काळात 4 वर्षात केवळ 25 लाख घरकुल झाली होती, असा दावा पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला होता. मात्र, पंतप्रधान मोदींचा हा दावा खोटा असल्याचे चव्हाण म्हणाले. 2004 ते 2013 या युपीएच्या काळात इंदिरा आवास योजनेत 2 कोटी 24 लाख घरकूल झाल्याचा दावा चव्हाणांनी केला. 

पंतप्रधानांनी आतापर्यंत झालेली आपली चूक मान्य करुन पुढे तरी आपल्याला सद्बुद्धी दे असं सांगितलं असतं तरी पुष्कळ झालं असतं. पण पंतप्रधान शिर्डी येथे साईबाबांच्या नगरीत जाऊनही खोट बोललेत, असे टिकास्त्र चव्हाण यांनी केले.

पंतप्रधान काय बोललेत...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन तासांच्या शिर्डी दौऱ्यात महाराष्ट्रात येत्या निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. गेल्या सरकारच्या काळात एका कुटुंबासाठी कामं केली जात असे, असं म्हणत मोदींनी गांधी कुटुंबावर हल्ला चढवला. दरम्यान, मोदींनी देशात सध्या राममंदिरावरून उठलेल्या वादावर मात्र मौन पाळलं.  

PM Modi brings Dussehra gifts for Shirdi, hands over house keys to over 2 lakh PMAY beneficiaries

फोटो - एएनआय

त्यांच्या हस्ते महाराष्ट्रात ग्रामीण भागात पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या लाभार्थींना घरांच्या चाव्या देण्यात आल्या. मोजक्या लाभार्थींना पंतप्रधानांनी स्वतः चाव्या दिल्या. तर महाराष्ट्रात जवळपास 24 जिल्ह्यातल्या लाभार्थींना ईगृहप्रवेश करवण्यात आला. 

आमच्या काळात चार वर्षात 1 कोटी घरं बांधली गेली. यूपीए २च्या पहिल्या चार वर्षात फक्त 25  लाख घरं बनल्याचा दावा यावेळी मोदींनी केला. शिर्डीत पंतप्रधानांच्या हस्ते साईंचं पाद्यपूजन करण्यात आलं. त्यासोबतच संस्थानच्यावतीनं उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचं भूमीपूजन करण्यात आलं.