मुस्लिमांनी सांगितल्यामुळेच काँग्रेसची शिवसेनेसोबत - अशोक चव्हाण

नांदेडमध्ये सीसीएला विरोध करण्यासाठी मेळावा 

Updated: Jan 20, 2020, 11:38 PM IST
मुस्लिमांनी सांगितल्यामुळेच काँग्रेसची शिवसेनेसोबत - अशोक चव्हाण  title=

मुंबई : राज्यातल्या मुस्लिमांनी सांगितल्यामुळेच काँग्रेसने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केल्याचे धक्कादायक विधान सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. नांदेडमध्ये सीसीएला विरोध करण्यासाठी मेळावा घेण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेना गप्प का ?

भाजप सत्तेमध्ये येऊ नये, असं तमाम मुस्लिमांना वाटत होतं. त्यामुळेच काँग्रेस सत्तेत आहे. जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत राज्यात सीसीएची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असंही चव्हाण म्हणाले आहेत. दरम्यान, चव्हाणांच्या या विधानावर शिवसेना गप्प का आहे ?, असा खोचक सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. त्यामुळे हा वाद आता कोणतं वळण घेतो हे पाहणं महत्वाच ठरणार आहे. 

पृथ्वीराज यांचा गौप्यस्फोट 

शिवसेनेला २०१४ मध्येच काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करण्याची इच्छा होती. पण तेव्हा काही जमलं नाही. हा एवढा मोठा आणि महत्त्वाचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. पृथ्वीराज चव्हाण हे आताच का बोलले असावे ? २०१४ मध्ये शिवसेनेला खरंच काँग्रेसबरोबर स्थापायची होती सत्ता ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.