पुणे : विसर्जन मिरवणुकीत डीजे लावल्याप्रकरणी पुण्यातील १० मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी म्हणजे बुधवारी अनेक भागांतील खासकरून उपनगरांतील बाप्पांना मिरवणुका काढून निरोप देण्यात आला. मात्र या दरम्यान काही मंडळांनी डीजेवर बंदी असताना डीजेचा दनदनाट केला.
पुण्यातील कोथरूड, डेक्कन, हडपसर, खराडी, चंदननगर तसेच वडगाव शेरीतील अशा १० मंडळांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मंडळांचे पदाधिकार तसेच डीजे ऑपरेटर्सवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याकडील साऊंड मिक्सर आदि साहित्यही जप्त करण्यात आले आहे. डीजे तसेच डॉल्बी बंदीबाबतचं प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलिंबित आहे. विसर्जन मिरवणूकीत डीजे डॉल्बी वाजवण्याला सरकारचा तीव्र विरोध आहे.
असं असताना नियमांचं पालन न करणाऱ्यांवर पोलिसांमार्फत कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. त्यामुळे विसर्जनाच्या किमान शेवटच्या दिवशी डीजेचा आवाज बंद असेल अशी अपेक्षा आहे.
१) यशवंत तरुण मंडळ ( चंदननगर )
२) ज्वाला मित्र मंडळ ( चंदननगर )
३)विनायक तरूण मंडळ ( चंदननगर )
४)एकता मित्र मंडळ ( चंदननगर )
५)राजहंस गणेश मित्र मंडळ ( हडपसर )
६) अखिल भोरी भडक मित्र मंडळ ( हडपसर )
७) अखिल हनुमाननगर मित्र मंडळ ( कोथरूड )
८) स्वराज मित्र मंडळ ( कोथरुड )
९) श्रीकृष्ण मित्र मंडळ ( कोथरूड )
१०) अभि सोल्युशन्स कंपनी गणपती