खान्देशात थंडीचा कडाका वाढला

थंडीचा कडाका वाढल्यानं खान्देशात बहुतांश ठिकाणी निचांकी तापमानाची नोंद झाली आहे.

Updated: Jan 12, 2019, 08:32 PM IST
खान्देशात थंडीचा कडाका वाढला title=

नाशिक : खान्देशसह राज्यात थंडी पुन्हा परतली आहे. थंडीचा कडाका वाढल्यानं खान्देशात बहुतांश ठिकाणी निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यात सतत तापमान 5 अंश खाली आहे. कडाक्याच्या थंडीचा परिणाम रब्बी पिकांवर देखील होतो आहे. थंडी ही रब्बी पिकांसाठी आवश्यकच आहे मात्र सर्वसाधारणपणे तापमान ७ अंशांपेक्षा खाली घसरल्यास सर्वच पिकांना थंडीचा फटका बसू शकतो. या शिवाय गहू, हरभरा, ज्वारी, मोहरी, सूर्यफूल, ऊस यांसह सर्वच पिकांना अतिथंडी मारक ठरते. केळी, पपई बागेवरही थंडीचा मोठा परिणाम होतो. पारा आणखी घसरला तर त्यांचंही नुकसान होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. अशा वेळी पिकांचं रक्षण कसं करावं, याबाबत कृषीतज्ञांनी मार्गर्शन केलं.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी वाढत आहे. राज्याच्या अनेक भागात थंडी वाढली आहे. पुढील काही दिवस थंडी अशीच राहणार आहे. थंडीमध्ये काही प्रमाणात चढ-उतार होऊ शकते. रात्री आकाश निरभ्र राहिल्यास दिवसभराची उष्णता वातावरणामध्ये निघून जाते. त्यामुळे रात्री थंडी वाढते. पण रात्री आकाश ढगाळ असल्यास दिवसभरातील उष्णता वातावरणातच राहते. त्यामुळे थंडीचा परिणाम कमी जाणवतो असं मत तज्ज्ञांनी वर्तवलं आहे.