अटींसह कर्जमाफीच्या घोषणेनंतर नागपुरात मुख्यमंत्र्यांचं स्वागत

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदार व मोठ्या संखेने भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

Updated: Jun 26, 2017, 10:37 AM IST
अटींसह कर्जमाफीच्या घोषणेनंतर नागपुरात मुख्यमंत्र्यांचं स्वागत title=

नागपूर : राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत अटींसह कर्जमाफीची घोषणा केल्यावर नागपुरात पोहचलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

 नागपूरच्या डॉ बाबासाहेब अंतराष्ट्रीय विमानतळावर नागपूर शहर भाजपच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत करण्यात आले. 

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि मोठ्या संखेने भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.