यवतमाळ : शिवभोजन केंद्रावरील किळसवाणा प्रकार समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) आता चौकशीचे आदेश दिले आहेत. यवतमाळच्या महागाव इथल्या शिवभोजन केंद्रावरील (Shivbhojan Kendra) भांडी शौचालयात धुतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. शिवभोजन थाळी खाणा-यांच्या जीवाशी खेळ सुरू होता. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
शौचालयात शिवभोजन थाळी (Shivbhojana thali) धुत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सदर केंद्र रद्द करण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रभावाने कारवाई केली आहे. सुरेखा नरवाडे संचालित त्रिमूर्ती महिला बचत गटाचे हे शिवभोजन केंद्र होते. सीएमओ कार्यालयाने गंभीर दखल घेतल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तीन सदस्यीय पथकानं घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन संचालिकेला नोटीस बजावण्यात आली होती. शिवभोजन थाळी (Shivbhojana thali) लाभार्थी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब देखील नोंदवण्यात आले होते.
झी 24 तास वर हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर सीएमओ (CMO) कार्यालयाने गंभीर दखल घेत कारवाई केली आहे.