धक्कादायक VIDEO! अतिक्रमण काढायला गेलेल्या अधिकाऱ्याचे असे हाल तुम्ही यापूर्वी पाहिले नसतील

अतिक्रमण हटवायला गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांचे झाले असे हाल

Updated: Mar 29, 2022, 05:07 PM IST
धक्कादायक VIDEO! अतिक्रमण काढायला गेलेल्या अधिकाऱ्याचे असे हाल तुम्ही यापूर्वी पाहिले नसतील title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणे महापालिकेच्या सदस्यांची मुदत संपताच शहरातील अतिक्रमणावर पालिकेचा बुलडोझर फिरवण्यास सुरवात झाली आहे. गेल्या 9 दिवसांत 1 लाख 37 हजार चौरफूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं असून एक हजारहून टपऱ्या पथारी हटवण्यात आले आहेत. 

मात्र आता कारवाई करताना अतिक्रमणच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

पुण्यातील धानोरी लक्ष्मीनगर सोसायटी इथं कारवाई सुरु असताना अतिक्रमणच्या अधिकाऱ्यांवर स्थानिक नागरिकांनी जोरदार हल्ला केला आहे. या मारहाणीत अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी, बांधकाम निरीक्षक प्रकाश कुंभार जखमी झाले आहेत. 

दरम्यान हा हल्ला स्थानिक नगरसेविकेच्या पतिने केल्याचा आरोप केला जात आहे. मारहाणीदरम्यान काही जणांनी जेसीबी वरती दगडफेकही केली.

या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. मारहाण प्रकरणी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.