"कसं काय पाटील बरं आहे का, दिल्लीमध्ये काय झालं ते खरं आहे का?"

पैठणच्या सभेमध्ये एकनाथ शिंदेंची जोरदार फटकेबाजी

Updated: Sep 12, 2022, 07:15 PM IST
"कसं काय पाटील बरं आहे  का, दिल्लीमध्ये काय झालं ते खरं आहे का?" title=

संभाजीनगर : दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनावेळी व्यासपीठावर बोलू न दिल्याचं नाराजी नाट्य राज्यभर चर्चेचा विषय ठरला.  आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याचा उल्लेख करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. पैठणमधील आयोजित सभेमध्ये बोलताना शिंदे यांनी, कसं काय पाटील बरं आहे या गाण्याच्या ओळी म्हणत पाटलांवर शेलक्या शब्दात टीका केली. 

जुन्या चित्रपटामध्ये एक गाणं होतं जे फेमस झालं होतं. कसं काय पाटील बरं आहे काल दिल्लीत झालं ते खरं आहे का?, जयंत पाटील यांनी दादांना बोलून दिलं नाही. त्यामुळे दादा निघून गेले रागारागाने, कारण जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेता व्हायचं होतं मात्र त्यांना होता आलं नाही, दादांची दादागिरी काम करूव गेली. याचं शल्य पाटलांच्या मनात होतं म्हणून महाराष्ट्रात त्यांना थांबवता येत नाही म्हणून दिल्लीत त्यांना थांबवल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

सरन्यायाधीश उदय लळीत यांचा सत्कार समारंभ एकनाथ शिंदे उपस्थित राहिले होते. यावरून पाटील यांनी टीकास्त्र डागलं होतं. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे सुपुत्र देशाचे सरन्यायाधीशांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. कोर्टाचा कार्यक्रम होता आम्हाला निमंत्रण दिलं होतं. आम्ही कार्यक्रमाला गेलो तर त्यावरूनही आमच्यावर टीका, किती संकोचित वृत्ती आहे, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. 

बाळासाहेबांची खरी शिवसेना कुठही याचं उत्तर आजच्या या सभेने दिली आहे. पैसे देऊन जमवलेली ही गर्दी नाही. प्रेमाने आलेली ही गर्दी आहे. ही सच्चा शिवसैनिकांची गर्दी आहे. आम्ही घेतलेल्या निर्णयाला पसंती देणारी ही गर्दी आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांनी एकच शिकवण दिली आहे. जे होणार असेल तेच बोला. मी दिलेला शब्द पाळतो आणि एकदा शब्द दिला की मी स्वत:चं ही ऐकत नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.