पवारांच्या बालेकिल्ल्यात... मुख्यमंत्र्यांनी आपल्याच शिलेदारांना केलं निराश

नातेपुतेकडं जाताना मुख्यमंत्र्यांनी जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांची भेट न घेतल्यानं त्यांची घोर निराशा झाली.

Updated: May 12, 2018, 09:52 PM IST
पवारांच्या बालेकिल्ल्यात... मुख्यमंत्र्यांनी आपल्याच शिलेदारांना केलं निराश  title=

बारामती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी बारामती विमानतळावर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या पदरी निराशा पडली... मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. पण प्रशासनानं त्यांना भेटूच दिलं नाही. त्यामुळं चिडलेल्या कार्यकर्त्यांनी काही काळ घोषणाबाजीही केली. जलसंपदा मंत्री राम शिंदे यांनी व्हीआयपी कक्षातून बाहेर येऊन कार्यकर्त्यांची समजूत काढली. मात्र तिथून नातेपुतेकडं जाताना मुख्यमंत्र्यांनी जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांची भेट न घेतल्यानं त्यांची घोर निराशा झाली.

यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी बारामती विमानतळावर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांना अक्षरशः अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावं लागलं... त्यामुळे घोषणाबाजीही करण्यात आली.