खोपोली : निसर्गाची किमया काय असते, याचं उत्तम उदाहरण खंडाळाच्या घाटात बघयाला मिळालं. खंडाळ्या घाटाखाली सह्याद्रीच्या डोंगरांच्या कुशीत वसलेलं खोपोली शहर अचानक ढगात हरवून गेलं.
एरवी लोणावळा खंडाळा घाट उतरताना खाली खोपोली शहर दिसतं. मात्र, साक्षात आकाशातील ढगांनी पूर्णपणे कब्जा केला होता. रस्त्यावरून अथवा मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वरून जाण-या आणि येणा-यांना निसर्गाचं हे विहंगम रुप बघायाला मिळालं.
विमान प्रवास करण-यांनाना नेहमीच जवळून ढग बघायाला मिळतात. रस्त्यावर प्रवास करताना मात्र असं दृश्य क्वचितच नजरेस पडतं. वातावरणातील बदलामुळे अनेक वर्षातून असा बदल पाहावयास मिळाल्यानं हे चित्र निर्माण झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणे आहे.