विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : आजवर वेगवेगळ्या वस्तूंच्या चोरीचे (thief) प्रकार तुम्ही ऐकले असतील. सोनं, चांदी, गाडी. पण कधी चॉकलेट चोरांबद्दल (chocolate) ऐकलंय का? तीही थोडीथोडकी नव्हे तर लाखो रुपयांची चॉकलेट चोरी. पाहुयात एक रिपोर्ट. (chocolate worth Rs 10 lakh ruppes stolen near at beed ambajogai)
आजवर तुम्ही कारचोरी, पैसे चोरी, सोनंचोरी ऐकलं असेल. पण कधी चॉकलेटचोरांबद्दल ऐकलंय का? बीडच्या आंबेजोगाईत दहा लाख रुपयांच्या चॉकलेटची चोरी करण्यात आलीय. विशेष म्हणजे गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या कामगारांनीच ही चोरी केलीय. आंबेजोगाईतील व्यापारी प्रदीप वाघमारे यांच्या गोडाऊनमध्ये काम करणारे कामगार अडीच ते तीन वर्षांपासून चॉकलेट चोरी करत होते.
व्यापाऱ्यात तोटा होत असल्यानं वाघमारेंनी गोदामात सीसीटीव्ही लावलं आणि त्यानंतर गोडाऊनमधले कामगारच चॉकलेट चोरी करत असल्याचं लक्षात आलं. राहुल पवार आणि गणेश मुनीम अशी या चॉकलेटचोरांची नावं आहेत.
तब्बल दोन ते तीन वर्ष. सातत्यानं हे चोर चॉकलेटची चोरी करत होते. त्यामुळे व्यापारी वाघमारेंना बरंच नुकसान होत होतं. तुम्हीही व्यापारी असाल तर अशा घटनांवर नजर ठेवा, सतर्क राहा, नाही तर तुमचा माल लंपास झालाच समजा.