बस रिव्हर्स घेताना ST ड्रायव्हरच्या हातून झाली मोठी चूक; 11 वर्षाच्या मुलाचा....

या घटनेनंतर  बसचा चालक आणि वाहक दोघेही बस जागीच सोडून फरार झाले आहेत. जव्हार पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Updated: Nov 10, 2022, 11:24 PM IST
बस रिव्हर्स घेताना ST ड्रायव्हरच्या हातून झाली मोठी चूक; 11 वर्षाच्या मुलाचा.... title=

हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : बस रिव्हर्स घेताना ST ड्रायव्हरच्या(ST Bus Driver) हातून झाली मोठी चूक झाली आहे. रिव्हर्स घेताना भिंतीला धक्का दिल्याने भिंत पडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण जखमी झाला आहे. पालघर(Palghar) जिह्यातील जव्हार(Jawhar) मध्ये ही घटना घडली आहे. 

जव्हार डेपो मध्ये ही दुर्घटना घडली आहे. डहाणू जव्हार बसच ड्रायव्हर बस रिव्हर्स घेत असताना हा अपघात झाला. एसटी बस  संरक्षक भीतीला धडकली.  बस धडकेत भिंत कोसळली. भिंत अंगावर पडून एका अकरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.  या मुलासह असलेला पंधरा वर्षीय मुलगा यात गंभीर जखमी झाला आहे.

बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर फरार

ओविस मडकिया अस मृत मुलाचे नाव आहे. तर, सिंनाल मोडिया रफिकभाई अस  जखमी असलेल्या मुलाचं नाव आहे. हे सर्व राजकोट येथील राहणारे आहेत. जखमी मुलावर जव्हारच्या कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर  बसचा चालक आणि वाहक दोघेही बस जागीच सोडून फरार झाले आहेत. जव्हार पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.