मुंबई : महाराष्ट्र बाल हक्क आयोगाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याचे प्रकरण देशभर गाजत आहे. या घटनेसंदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटर वर भाष्य करून एक व्हिडिओही ट्विटरवर अपलोड केला होता. त्यामुळे बाल हक्क कायद्याचं उल्लंघन झाल्याचं बाल हक्क योगाकडे आलेल्या तक्रारीमध्ये नमूद केलंय.