CM Eknath Shinde : गुवाहाटीला गेलो तेव्हा श्री. श्री.रविशंकर गुरुजींनी मला फोन केला आणि... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खुलासा

शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगसह गुवाहाटी देखील फेमस झाले. 

Updated: Feb 2, 2023, 03:41 PM IST
CM Eknath Shinde : गुवाहाटीला गेलो तेव्हा श्री. श्री.रविशंकर गुरुजींनी मला फोन केला आणि... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खुलासा title=

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) 40 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन सुरत गेले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला. उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार रातोरात कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन थेट गुवाहाटीला गेले. यामुळे गुवाहाटी चांगलेच चर्चेत आले. एकनाथ शिंदे यांच्या या गुवाहाटी दौऱ्याबाबत अनेक खुलासे होत आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी   श्री. श्री.रविशंकर गुरुजी (Shri. Shri Ravi Shankar Guruji) यांचे नाव घेत या दौऱ्याबाबत आणखी एक खुलासा केला आहे.  

जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा श्री. श्री.रविशंकर गुरुजींनी फोनवर मला आशीर्वाद दिला होता असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जालना येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा खुलासा केला. जालना येथील एका कार्यक्रमात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह श्री. श्री.रविशंकर गुरुजी उपस्थित होते. आम्ही कार्यक्रम केला म्हणून असे कार्यक्रम होऊ लागले असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. 

जालना येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं वाटुर येथे  भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते.आम्ही जेव्हा गुवाहाटीला होतो तेव्हा गुरुजींनी मला फोन करून आशीर्वाद दिला होता असा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी केला. 

आम्ही कार्यक्रम केला म्हणून असे कार्यक्रम होऊ लागले असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन ठाकरे सरकारला टोला लगावला. दरम्यान आधीच्या सरकारनं दुर्दैवानं जलयुक्त शिवार योजना बंद केली. ती आम्ही सुरु केली. त्याचबरोबर बंद पडलेली मराठवाडा वाॅटरग्रीड योजना पुन्हा सुरु केली जाईल असे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान धर्म सोडून राजकारण केलं तर ते जास्त दिवस टीकत नाही असं श्री श्री रविशंकर यांनी म्हंटले.

शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगमुळे गुवाहाटी फेमस

एकनाछ शिंदेंसह गुवाहाटी गेलेल्या 40 आमदारांमध्ये सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा देखील समावेश होता. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी गुवाहाटीमधून आपल्या एका कार्यकर्त्याला फोन केला होता. काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल असं म्हणत गुवाहाटीची माहिती कार्यकर्त्याला दिली होती. त्यांची ही ऑडिओक्लीप व्हायरल झाली. यानंतर काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल हा शहाजीबापूंचा डायलॉग चांगलाच फेमस झाला. अलीकडेच एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटी दौऱ्यावर गेले होते.