प्रियंका गांधी-वाड्रांवर चंद्रकांत पाटील यांची टीका

आपण इंदिरा गांधींसारख्या दिसतो म्हणून प्रियंका गांधी प्रचार करतात. दिसण्यावरून जर निवडणूक जिंकली असती तर तर अभिनेत्री हेमामालिनी पंतप्रधान.

Updated: Mar 22, 2019, 08:17 PM IST
प्रियंका गांधी-वाड्रांवर चंद्रकांत पाटील यांची टीका title=
संग्रहित छाया

कोल्हापूर : आपण इंदिरा गांधींसारख्या दिसतो म्हणून प्रियंका गांधी प्रचार करतात. दिसण्यावरून जर निवडणूक जिंकली असती तर तर अभिनेत्री हेमामालिनी पंतप्रधान झाल्या असत्या. प्रियंका चोप्रा, माधुरी दीक्षित या सगळ्याच रांगेने पंतप्रधान झाल्या असत्या, अशी टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी - वाड्रा यांच्यावर केली. 24 मार्च रोजी कोल्हापुरातल्या तपोवन मैदानावर भाजप - शिवसेना युतीचा प्रचार शुभारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात आयोजित केलेल्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते.

INKredible India: The story of 1980 Lok Sabha election - All you need to know

इंदिरा गांधी (Photo courtesy: inc.in)

काँग्रेसने प्रियंका गांधी यांना पूर्व उत्तर प्रदेशचे महासचिव म्हणून नियुक्त केले. त्यानंतर काँग्रेसने आपला मास्टरस्ट्रोक निवडणुकीत वापरल्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली. या संदर्भात राजकीय पक्षांची सतत प्रतिक्रिया येत आहेत. या मोठ्या घटनेवर निवडणुकीची रणनीती ठरविणारे जेडीयूचे नेते प्रशांत किशोर यांनी ट्विट केले आहे. विशेष शैलीत प्रियंका गांधी यांना ट्विट करुन शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, "भारताच्या राजकारणात बहुप्रतिक्षित असणारा हा क्षण अखेर आला. त्यांच्या येणाची वेळ, त्यांची वास्तविक भूमिका आणि त्यांच्या पदाबाबत चर्चा होत राहतील. मात्र, माझ्या मते खरी गोष्ट त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नव्या 'इंदिरा' बनणार का 'प्रियंका' गांधी?

प्रियंका गांधी-वढेरा यांची नियुक्ती एक मास्टरस्ट्रोक ठरणारी आहे, अशी प्रतिक्रीया सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. या नियुक्तीमुळे उत्तर प्रदेशात कार्यकर्त्यांत उत्साह आणि त्यांचे मनोबल वाढण्यासाठी मदत होणार आहे. या ठिकाणी काँग्रेसचा जनाधार कमी होत होता. आता या निवडीमुळे त्यात वाढ होण्याचे संकेत आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. त्यामुळे काँग्रेसचे या जागांवर अधिक लक्ष असणार आहे. तसेच समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीची युती आहे. येथे काँग्रेस दोघांना सहकार्य करणार आहे. त्यामुळे प्रियंका गांधी यांची भूमिका येथे महत्वाची ठरणार आहे.