पुणे : महाराष्ट्र भाजपमधील सर्वात महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांना पुण्यातील कोथरूड मतदारसंघ सोडावा लागला. पक्षाने चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी दिली आणि विशेष म्हणजे विरोधीपक्षाने चंद्रकांत पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी की काय? येथे उमेदवार ठेवला नाही.
मनसे आणि वंचितचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यासमोर उभे ठाकले होते, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना ही लढाई अधिक कठीण होईल असं म्हटलं जात होतं. म्हणून अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे कोथरूड मतदारसंघाकडे होतं.
अखेर चंद्रकांत पाटील या मतदारसंघातून निवडून आले, कारण पवारांशी थेट पंगा घेणारे चंद्रकांत पाटील निवडून येतील का हा प्रश्न सर्वांना पडला होता.