मुंबई : Rain News : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. तसा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून पंचगंगा नदीच्या पाण्याने चौथ्यांदा धोक्याची पातळी गाठली आहे. दरम्यान, राधानगरी धरणाच्या चार दरवाज्यामधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई, ठाण्यासह (Rain in Mumbai and Thane) कोकणात मुसळधार पावसाची (Rain in Konkan) शक्यता, हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तसेच रायगड, रत्नागिरीत जोरदार पाऊस बरसणार आहे. तर पालघरमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Torrential rains in Palghar)
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टी निर्माण झाल्याने आज पुन्हा जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दमण, पालघर, कल्याण, रायगड, पुणे- नाशिक घाट क्षेत्र, जुन्नर आणि रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन ते चार तासांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दमदार पावसामुळे मुंबई, पुणे नाशिकमधली धरणं भरली आहेत. मराठवाड्यातही समाधानकारक पाऊस झाला आहे. तर जायकवाडीसह प्रमुख धरणांत चांगला पाणीसाठा झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे नद्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालीय. पंचगंगा नदीच पाणी यंदाच्या पावसाळ्यात चौथ्यादा पात्राबाहेर गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण होते का असा प्रश्न चिन्ह निर्माण झालाय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरण 100 टक्के भरले आहे. धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे उघडलेत आहेत. अन्य लघु पाटबंधारे प्रकल्प देखील तुडुंब भरले असून त्यातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सर्वाधिक पावसांची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली आहे.
Mod to intense low medium clouds observed in latest radar obs at 12.15 am night over Daman, North of Palghar, Kalyan, Raigad, Pune- Nashik ghat areas, Junnar and Rtn too
Watch for some intense spells possible in next 3,4 hrs of time.
Please see IMD updates pic.twitter.com/lmPuebfk5Y— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 13, 2021
मुंबई आणि परिसरात काल दिवसभरात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून आले. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होता. दरम्यान, कोकणात ठिकाणी चांगला पाऊस झाला.