पाच जिल्ह्याच्या शाळांमध्ये 'चला खेळू या' उपक्रम

कॉम्प्युटर, मोबाइल, स्मार्ट टीव्हीमुळे मुलं मैदानात फिरकेनाशी झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठ्पणा वाढत आहे. 

Updated: Oct 9, 2017, 02:32 PM IST

नाशिक : कॉम्प्युटर, मोबाइल, स्मार्ट टीव्हीमुळे मुलं मैदानात फिरकेनाशी झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठ्पणा वाढत आहे. 

हे टाळून येणारी पिढी सुदृढ आणि आरोग्यवान असावी यासाठी, नाशिक विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी, नाशिक विभागातल्या नर्सरी ते आठवीतल्या मुलांसाठी चला खेळूया हा उपक्रम सुरु केला आहे. 

पाच जिल्ह्यांतल्या सर्व शाळांत हा उपक्रम राबवला जाणार असून, फक्त अभ्यास आणि बैठे खेळ न खेळता, मुलांनी मैदानी खेळांद्वारे तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावं, हा यामागचा हेतू आहे.