पुण्यात सिझेरियनची संख्या वाढतेय

घरात बाळ होणं हे कोणत्याही कुटुंबासाठी आनंदाचीच गोष्ट..... पण सध्या बाळ जन्माला येण्याची प्रक्रिया फारच झटपट झालीय का...... नॉर्मल डिलीव्हरीपेक्षा सिझेरियनची संख्या वाढतेय..... नेमकं हे का होतंय..... ? 

Updated: Oct 30, 2017, 11:48 PM IST
पुण्यात सिझेरियनची संख्या वाढतेय title=

अश्विनी पवार , झी मिडीया , पुणे : घरात बाळ होणं हे कोणत्याही कुटुंबासाठी आनंदाचीच गोष्ट..... पण सध्या बाळ जन्माला येण्याची प्रक्रिया फारच झटपट झालीय का...... नॉर्मल डिलीव्हरीपेक्षा सिझेरियनची संख्या वाढतेय..... नेमकं हे का होतंय..... ? 

बाळाचा जन्म झाल्यावरचा पहिला प्रश्न म्हणजे बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत का ? आणि दुसरा प्रश्न म्हणजे नॉर्मल डिलीव्हरी की सिझरीन ?..... या प्रश्नाचं सध्या सर्रास ऐकायला मिळणारं उत्तर म्हणजे सिझरीन.....  आकडेवारीसुध्दा हेच सांगते.... पुण्यामध्ये  गेल्या काही वर्षात प्रसुतीमध्ये सिझेरिअनचं प्रमाण वाढल्याचं  माहिती  अधिकारात पुढे आलंय..  

माहिती अधिकारात मिळालेल्या आकडेवारीनुसार 

2010-11 मध्ये झालेल्या  36185  प्रसूतींपैकी 2636 सिझेरिअन्स होती. 
मात्र हेच प्रमाण 2011- 12 मध्ये दुपटीनं वाढलं
20111 -12 मध्ये  37117 प्रसूतींपैकी 5189 सिझेरिअऩ झाले....
2012- 13  मध्ये  37288 प्रसूतींपैकी 6902 सिझेरिअन तर 
2013-14 मध्ये पुन्हा एकदा हे प्रमाण दुपटीने वाढल्याचं आकडे वारी सांगते
2013-14  37902 प्रसृतीं पैकी 12566 सिझेरिअन झाले आहेत
तर 2014-15 मध्ये    35380 प्रसूतींपैकी 11104 
सिझेरियन,  2015-16 मधल्या    24578 प्रसूंतींपैकी  7566
आणि 2016-2017मध्य़े 24298 प्रसूतींपैकी 11410 प्रसूती सिझेरिअन पद्धतीनं पार पडल्या. 

वाढत्या सिझेरिअनचं कारण जीवनशैली सोबत जरी जोडलं जात असलं तरी त्याची एक दुसरी बाजूही आहे.... होणा-या बाळाच्या मानेभोवती नाळ असणं, पोटातलं पाणी कमी होणं, बाळ फिरणं, बाळाचं वजन जास्त असणं, आईला प्रसूतीकळांपासून सुटका हवी असणं, एखाद्या विशिष्टच दिवळी बाळ जन्माला येण्याचा आग्रह अशा कारणांमुळे सिझेरियन केलं जातं.  आणि यासाठी  50 हजार ते 1 लाखापर्यंतचं बिल नातेवाईकांच्या माथी मारलं जातं ...जिवाशी खेळ नको म्हणून नातेवाईकही ब-याचदा सिझेरिअनला संमती देतात...मात्र केवळ बिल वाढविण्यासाठीच सिझेरियन लादलं जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता अजहर खान यांनी केलाय...

पुण्यातील खाजगी आणि सरकारी हॉस्पिटल मध्ये मिळून वर्षाला सरासरी 50 हजार प्रसूती पार पडतात.... विशेष म्हणजे खाजगी हॉस्पिटलच्या तुलनेत सरकारी हॉस्पिटलमधील सिझेरिअन प्रसुतीचं प्रमाण पन्नास टक्क्यांनी कमी आहे... सरकारी रुग्णालयांमध्ये भरती होणा-या महिला शक्यतो कष्टकरी आणि सर्वसाधारण कुटुंबातील असतात.. त्यांची प्रसूती अधिक गुंतागुतीचा असण्याची शक्यता जास्त असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे...मात्र तरीही  सरकारी रुग्णालयांपेक्षा खाजगी रुग्णालयांतली आकडेवारी जास्त आहे. केवळ पैशासाठी आणि वेळ वाचावा म्हणून खाजगी रुग्णालयाकडून गरज नसताना सिझेरियन केलं जातं, असं स्त्रीरोगतज्ज्ञही मान्य करतात. 

यासंदर्भात प्रसूती करणा-या डॉक्टरांचीही बाजू आहे. शहरी भागातली बदलणारी जीवनशैली, वयाच्या पंचविशीनंतर होणारं बाळंतपण अशा अनेक कारणांमुळे प्रसूती गुंतांगुतींची होते. त्यामुळेच पेशंटच्य़ा नातेवाईकांच्याच सल्ल्य़ानेच सिझेरिअन केलं जातं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 

गरज नसताना सिझेरिअन केलं जातं का, असा प्रश्न गेल्या काही वर्षांत प्रकर्षानं उपस्थित केला जातोय.... या बाबींवर नियंत्रण ठेवता येईल का, यासाठी एक समिती नेमण्याचा प्रस्ताव असल्य़ाचं पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय...

तज्ञांच्या सांगण्यानुसार सिझेरिअन प्रसृतीची टक्केवारी भारतापेक्षा पाश्चिमात्य देशांमध्ये कमी आहे.. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या दिलेल्या निर्देशानुसार सिझेरियनचं प्रमाण नैसर्गिक प्रसुतीच्या केवळ 8 ते 15 टक्के असायला हवं.. एकट्या पुण्यात सिझेरीयनचा हा दर तीस टक्क्यांच्या आसपास आहे.....याचा अर्थ सगळेच डॉक्टर पैशासाठी सिझेरीयन करतात, असा नक्कीच नाही.... पण सिझेरीयनची वाढलेली आकडेवारी हीसुद्धा कुठेतरी पाणी मुरतंय, या शंकेला पुष्टी देणारी आहे.