मध्य रेल्वेत 2400 पदांवर दहावी उत्तीर्णांना संधी, लेखी परीक्षा नाही; 'ही' घ्या अर्जाची लिंक

Central Railway Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांना मध्य रेल्वे भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 4, 2023, 09:40 AM IST
मध्य रेल्वेत 2400 पदांवर दहावी उत्तीर्णांना संधी, लेखी परीक्षा नाही; 'ही' घ्या अर्जाची लिंक title=

Job For SSC Pass: केवळ दहावी उत्तीर्ण असल्याने नोकरी कोण देणार? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर काही काळजी करु नका. कारण रेल्वेमध्ये तुम्हाला चांगल्या पद आणि पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेमध्ये बंपर भरती सुरु असून दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी आहे.मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याच सविस्तर तपशील देण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या अप्रेंटिस भरतीमुळे एकूण 2409 नोकऱ्यांची संधी निर्माण झाली आहे. प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://rrccr.com/ या लिंकवर जाऊन अर्ज करता येणार आहे. 

मध्य रेल्वे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच तुमच्याकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा असणे आवश्यक गरजेचे आहे. 

प्रशिक्षणार्थी  पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर क्लस्टरमध्ये नोकरी करावी लागणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच सामान्य, ओबीसी आणि EWS श्रेणीच्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही.

GOVT Job: पदवीधरांनो, कॉम्प्युटर ऑपरेटिंग येतं? मुंबईत मिळेल 1 लाख पगाराची नोकरी

अशी होईल निवड 

रेल्वेच्या या भरती पदासाठी अर्ज करणाऱ्यांकडून कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या. यासाठी गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावले जाईल. यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाते. ते पास केल्यानंतर उमेदवारांना ऑफर लेटर पाठवले जाईल.

Bank Job: कमी शिक्षण झालंय? BOI मध्ये मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

प्रशिक्षणार्थी पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट rrcr.com वर जा. ऑनलाइन अर्जावर क्लिक करुन मागितलेले तुमचे सर्व तपशील भरून फॉर्म भरा. यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. पुढे क्लिक केल्यावर पेमेंटचा पर्याय येईल. पेमेंट करा आणि फॉर्म सबमिट करा.फॉर्म सबमिट करण्यापूर्वी भविष्यातील उपयोगासाठी त्याची प्रिंट काढायला विसरु नका. 28 सप्टेंबर 2023 अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे.

दहावी उत्तीर्णांनी अर्जाच्या लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

SBI च्या मुंबई शाखेत नोकरी

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत सिनीअर वाइस प्रेसिडंटचे पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीजीडीएम/ पीजीडीबीएस/ एमबीए किंवा त्या समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कामाचा 15 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. एसबीआयच्या  वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी होणारी मुलाखत 100 गुणांची असेल. मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उतरत्या क्रमाने गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्या. किमान पात्रता गुण मिळवलेल्या एकापेक्षा जास्त उमेदवारांची कट-ऑफ गुणांची यादी  त्यांच्या वयानुसार उतरत्या क्रमाने तयार केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले असून 7 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.