कोल्हापूर : हेमाडपंथी बांधकामाचा अदभुत नमुना असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सवाचा सोहळा पार पडला. आजच्या पहिल्या दिवशी पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव झाल्यामुळं भक्तांनी समाधान व्यक्त केलं.
वर्षातून दोनदा म्हणजेच 31 जानेवारी, 1, 2 फेब्रुवारी आणि 9,10,11 नोंव्हेंबर या दोन वेळेस कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात किरणांचा खेळ पाहायला मिळतो. हा किरणोत्सव सोहळा पाहाण्यासाठी महालक्ष्मी मंदिरात भक्तांची आलोट गर्दी असते.
आज सायंकाळी 5 वाजून 22 मिनिटांनी सूर्य किरण गरुड मंडपात आली आणि त्यानंतर गर्भकुटीत येवून महालक्ष्मी देवीच्या चरणांवर स्थिरावली. आजच्या पहिल्या दिवशी पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव झाल्यामुळं देवीची आरती करण्यात आली. आज सूर्याची तीव्रता चांगली होती, त्यामुळं उद्या आणि परवा किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं होईल असं अभ्यासकांना वाटतंय.