नागपूर : आक्रोश मेळाव्यात काँग्रेस नेत्यांची भाषा घसरल्याचे दिसून आले. भाजप नेत्यांना कुत्र्याची उपमा देत विजय वडेट्टीवारांची शिवराळ भाषा वापरली तर विलास मुत्तेमवार यांनी मुक्ताफळे उधळलीत.
नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काल नागपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या आक्रोश मेळाव्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि विलास मुत्तेमवार यांनी भाजप नेत्यांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केलीये. भाजपवाले हे गावठी कुत्र्यासारखे आहेत. आपण घाबरलो की अंगावर येतात आणि दगड उचलला की दूर पळतात, अशा शब्दांत वडेट्टीवारांनी शिवराळ भाषा वापरलीये.
इन्कम टॅक्सच्या ४० नोटीसा पाठवल्या पण माझं काहीच बिघडलं नाही, अशी दर्पोक्ती करतानाही त्यांची भाषेची पातळी घसरली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वतःला मर्द का बच्चा म्हणतात. मात्र नोटबंदीच्या दिवशी त्यांच्यातला मर्द का बच्चा कुठे गेला होता, असं विचारताना मुत्तेमवारांनी गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला. आता याचीच चर्चा जोरदार सुरु आहे.