धक्कादायक! भरधाव कारनं महिलेला 30 फूट फरफटत नेलं, पाहा थरारक व्हिडीओ

रस्ते अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. आज एक विचित्र अपघात समोर आला. अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बाईकवर बसलेली महिला खाली कोसळली आणि मागून भरधाव कार आली. हा विचित्र अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Updated: Feb 17, 2022, 03:47 PM IST
धक्कादायक! भरधाव कारनं महिलेला 30 फूट फरफटत नेलं, पाहा थरारक व्हिडीओ title=

निलेश वाघ, झी 24 तास, मनमाड : रस्ते अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. आज एक विचित्र अपघात समोर आला. अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बाईकवर बसलेली महिला खाली कोसळली आणि मागून भरधाव कार आली. हा विचित्र अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नाशिकच्या सटाणा शहरात हा विचित्र अपघात झाला. भरधाव कारनं महिलेला अक्षरश: 30 फुटांपर्यंत फरफटत नेलं. मन विचलित करणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. 

सटाण्याच्या चारफाटा परिसरात जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली अपघातात महिला खाली पडली. खाली पडलेल्या महिलेला अक्षरशः तीस फुटापर्यंत फरफटत नेलं. महिला खाली कोसळल्याचं कळल्यानंतही ही कार थांबली नाही. 

या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून जखमी महिलेवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.