''तामिळनाडूसारखी आपणही नीट परीक्षा नाकारली तर महाराष्ट्रातील मुलांना फायदा''

तामिळनाडूमध्ये नीट परीक्षेवर बंदी आणण्यात आली आहे. 

Updated: Sep 22, 2021, 12:05 PM IST
''तामिळनाडूसारखी आपणही नीट परीक्षा नाकारली तर महाराष्ट्रातील मुलांना फायदा'' title=

मुंबई : तामिळनाडूमध्ये नीट (NEET) परीक्षेवर बंदी आणण्यात आली आहे. या बंदीनंतर आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनीही अशीच मागणी केली आहे.

न्यूज एजेंसीच्या माहितीप्रमाणे, त्यांनी राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET परीक्षेची सक्ती दूर करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने तमिळनाडूप्रमाणेच NEET मधून वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या उमेदवारांना सूट दिली पाहिजे.

नाना पटोले म्हणाले की, "अनेक ठिकाणी NEET गैरप्रकार झाल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले. ही परीक्षा NCERT च्या बेसवर असल्याने राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थी मागे पडतात. म्हणूनच महाराष्ट्राने देखील तामिळनाडूप्रमाणे HSC च्या बेसवर मेडीकलला प्रवेश देण्याची भूमिका घ्यावी."

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तामिळनाडूनमध्ये राज्य सरकारने NEET बंद करून बारावीच्या गुणांच्या आधारावर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, तसा निर्णय महाराष्ट्रात व्हावा यासाठी भूमिका घ्यावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यासदंर्भात मागणी केली असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय.

तमिळनाडू सरकारचा निर्णय

नीट यूजी परीक्षेच्या 19 तासांपूर्वी तामिळनाडूमध्ये एका विद्यार्थ्याने परिक्षा होण्यापूर्वी आत्महत्या केली. शिवाय परीक्षा झाल्यानंतर एका विद्यार्थिनीनेही आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. हे आत्महत्येचे पडसाद राज्याच्या विधानसभेत दिसून तामिळनाडू राज्यात नीट परीक्षा नको, अशी भूमिका असणारं विधेयक मांडण्यात आलं. तामिळनाडूतील भाजप वगळता इतर राजकीय पक्षांना पाठिंबा देत विधेयक मंजूर केलं. तामिळनाडूमध्ये आता 12 वीच्या गुणांवर मेडिकल अभ्यासक्रमांना प्रवेश मिळेल.