मुंबई : Vegetables Price : महागाईत (Inflation) दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलनंतर गॅस दरवाढ झाली. आता भाज्यांचे दर कडाडले आहेत. त्यातच लहरी पावसाचा शेतीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यातच इंधन दरवाढीमुळे भाजीपाला महागला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटला कात्री लागली आहे. (Increase in the price of vegetables in Maharashtra)
लहरी पावसामुळे भाजीपालाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे, भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. त्यात इंधन दरवाढीचा परिणाम भाज्यांच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे. कांदा-बटाटा आणि कोबी वगळता बहुतांश सर्व भाज्यांचे दर तेजीत आहेत. घाऊक बाजारांत कवडीमोल दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी काही भाज्या फेकून दिल्यात. पुरेशी लागवड न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक कमी होत आहे.
कारले 60
गिलके 35
दोडके 35
भेंडी 60
गवार 60
हिरवी मिरची 60
वांगे 40
शिमला मिरची 40
घेवडा 60
बटाटा 35
मेथी 40 रुपये जुडी.
कोथिंबीर 40 रुपये जुडी.
कांदापात 40 रुपये जुडी.
शेपू 35 ते 40 रुपये जुडी.
पालक 35 रुपये जुडी.